
कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी पालिका सज्ज झाली असून आता एका कोरोनाबाधित रुग्णामागे 20 जणांचे का@ण्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात येणार आहे. आतापर्यंत एका रुग्णामागे 15 जण शोधून क्वारंटाइनसह आवश्यक उपाययोजना करण्यात येत होत्या. मात्र तिसऱया लाटेत कोरोनाचा नवीन वेगाने प्रसाराचा स्ट्रेन येणार असण्याचा धोका आरोग्यतज्ञांकडून देण्यात आल्यामुळे पालिकेने आता का@ण्टॅक्ट ट्रेसिंग वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
युरोप-अमेरिकेसह इतर काही देशांमध्ये ‘कोविड-19’ या साथरोगाच्या तिसऱया लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका क्षेत्रातदेखील या तिसऱया लाटेची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक नियोजन व तयारी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्या नेतृत्वाखाली पालिका प्रशासनाद्वारे कार्यवाही करण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने खाटांची उपलब्धतता वाढविणे, कोविड उपचार पेंद्र व रुग्णालये इत्यादींची संख्या वाढविण्यासह ते अधिक सुसज्ज करणे, कोविड चाचण्यांची संख्या वाढविणे, प्रतिबंधित क्षेत्रांची अधिक प्रभावी अंमलबजावणी करणे इत्यादी बाबींचा समावेश आहे. या सुविधांसाठी पालिकेच्या सर्व म्हणजे 7 परिमंडळांना आणि 24 विभाग कार्यालयांना आवश्यक ते नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कोविड केअर सेंटर तैनात
पहिल्या व दुसऱया लाटेदरम्यान पालिका प्रशासनाद्वारे अनेक ठिकाणी ‘कोविड उपचार पेंद्र – 1’ आणि ‘कोविड उपचार पेंद्र – 2’ उभारण्यात आली होती. यापैकी ‘कोविड उपचार पेंद्र – 1’ मध्ये लक्षणे नसलेल्या कोविडबाधित रुग्णांवर उपचार केले जात होते. तर काही प्रमाणात लक्षणे असलेल्या (Mild Symtamatic) रुग्णांवर ‘कोविड उपचार पेंद्र – 2’ मध्ये वैद्यकीय उपचार क्रमानुसार उपचार केले जातात. यानुसार कोविड उपचार पेंद्र ठिकाणांचे निरीक्षण करून त्यांची यादी व संबंधित ठिकाणी आवश्यक असणारे मनुष्यबळ व आवश्यक असणाऱया सेवा इत्यादी तपशिलाचीही नोंद घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सद्यस्थितीत 30 हजार 364 बेडची व्यवस्था
पालिका क्षेत्रातील विविध रुग्णालयांमध्ये जुलैअखेरीस उपलब्ध आकडेवारीनुसार 30 हजार 364 बेड उपलब्ध आहेत. यामध्ये 17 हजार 697 ऑक्सिजन रुग्णशय्या, 3 हजार 788 अतिदक्षता रुग्णशय्या, लहान मुलांसाठी 1 हजार 460 रुग्णशय्या, लहान मुलांसाठीच्या अतिदक्षता कक्षात 230 रुग्णशय्या आणि नवजात बालकांसाठीच्या अतिदक्षात कक्षात (NICU) 53 बेड उपलब्ध आहेत.
अशा करणार उपाययोजना
- कोविड चाचण्यांची संख्या अधिकाधिक वाढविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये ‘आरटीपीसीआर’ चाचणी व ‘रॅपिड अॅण्टीजेन’ चाचणी या दोन्ही प्रकारच्या चाचण्यांचा समावेश आहे.
- प्रतिबंधित क्षेत्रांमधील बाधित रुग्ण आणि संशयित रुग्ण यांच्या स्तरावर अधिकाधिक प्रभावी व सातत्यपूर्ण पाठपुरावा नियमितपणे करण्याचे आदेश.
- 24 विभागांमध्ये असलेल्या नियंत्रण कक्ष (Ward War Room) चा आढावा घेण्यात येत आहे. लहान मुलांना संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक ते प्रशिक्षणदेखील नियंत्रण कक्षांमध्ये कार्यरत असणाऱयांना देण्यात येणार आहे.
- जम्बो कोविड रुग्णालये आणि कोविड उपचार पेंद्र इत्यादी ठिकाणी असणाऱया सोयी-सुविधा, वैद्यकीयदृष्टय़ा आवश्यक असणाऱया बाबींचा पुरवठा, साफसफाई व स्वच्छताविषयक सेवा, खानपान सेवा इत्यादींबाबतदेखील आढावा घेण्यात येत आहे.






























































