मॅगी विकून एका दिवसात कमवतो भलीमोठी रक्कम, इंटरनेटवर व्हायरल कंटेट क्रिएटरची कहाणी

viral content creator earns rs 21,000 in one day selling maggi in mountains

दोन मिनिटात चपटीत आणि पोटभर नाश्ता म्हणजे मॅगी. आता मॅगी शरिराला कशाप्रकारे हानी पोहोचवते हे सगळ्यांच्या चर्चेत असले तरी मॅगी खाणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. आबालवृद्ध मॅगीचे दिवाने आहेत. डोंगरदऱ्यांत फिरायला गेल्यावर गरम गरम मॅगी खाण्याची मजा काही वेगळीच असते. पण याच मॅगीच्या विक्रीतून एका दिवसात किती कमाई होऊ शकते, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? एका कंटेंट क्रिएटरने केलेल्या प्रयोगाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, त्याच्या एका दिवसाच्या कमाईने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

एका दिवसात २१ हजारांची कमाई!

बादल ठाकूर नावाच्या एका कंटेंट क्रिएटरने डोंगराळ भागात मॅगीचा स्टॉल लावला. त्याने साध्या मॅगीची प्लेट ७० रुपयांना, तर ‘चीज मॅगी’ १०० रुपयांना विकली. दिवसभरात त्याने साधारण ३०० ते ३५० प्लेट्सची विक्री केली आणि दिवस अखेर त्याने २१,००० रुपये कमावल्याचा दावा केला. ‘सेलिंग मॅगी इन माउंटेन्स फॉर अ डे’ या कॅप्शनसह शेअर केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

सोशल मीडियावर मजेशीर प्रतिक्रिया

हा आकडा पाहून नेटकऱ्यांनी गणित मांडायला सुरुवात केली. ‘जर एका दिवसात २१ हजार मिळत असतील, तर महिन्याची कमाई ६ लाखांच्या पुढे जाईल’, अशी चर्चा रंगू लागली. काही युजर्सनी गंमतीत ‘मी आता माझी कॉर्पोरेट नोकरी सोडू का?’ असे विचारले, तर काहींनी फिटनेस सोडून मॅगी विकणे परवडेल असे म्हटले.

मात्र, वास्तव थोडे वेगळे आहे…

२१,००० रुपये ही एकूण विक्री (Gross Income) आहे, नफा (Profit) नाही. काही सुजाण नेटकऱ्यांनी यातील खर्चाचे गणितही मांडले.

मॅगी पाकिटांची किंमत, गॅस सिलेंडर, कागदी डिश, वाहतूक खर्च आणि मदतीला असलेल्या कामगाराचा पगार धरल्यास निव्वळ नफा ८ ते ९ हजारांच्या आसपास असू शकतो.

शिवाय, उणे १० डिग्री तापमानात दिवसभर उभे राहून काम करणे हे आव्हानात्मक असल्याचेही अनेकांनी नमूद केले.

तरीही, पदवी घेऊन मिळणाऱ्या पगारापेक्षा ही कमाई अधिक असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

viral: content creator earns rs 21,000 in one day selling maggi in mountains

a viral video shows a content creator making rs 21,000 by selling maggi in the mountains. see how much a mountain maggi vendor can earn daily.