सांगलीत भाजप नेत्यांमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, भाजप खासदाराच्या निशाण्यावर माजी आमदार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सांगलीमध्ये भाजप नेत्यांमधील वाद सुरूच आहेत. खासदार संजयकाका पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन माजी आमदार विलासराव जगताप यांनाच लक्ष्य केले. जगताप यांना पाटील यांनी विकृत बुद्धीचे असे म्हटले. काँग्रेस नेते विशाल पाटील यांनाही त्यांनी ‘अदखलपात्र’ असा शब्द वापरला आहे. सांगलीतील कायदा-सुव्यवस्था बिघडली असून आपण यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून तक्रार करणार असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले. सांगलीच्या जत येथील एका कार्यक्रमात माजी आमदार जगताप यांनी संजयकाका पाटील हे खेकडय़ाच्या प्रवृत्तीचे असल्याची टीका केली होती. तर संजयकाका पाटील यांनी खासदार असूनही जिह्यासाठी कोणताही निधी आणला नाही, असा आरोप केला होता.