
तमिळनाडूतील 6वीत शिकणाऱ्या मुलाच्या आई-वडिलांनी तो शिकत असलेल्या शाळेतील शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. हिंदू देवी-देवतांची बदनामी करणे आणि धर्मपरिवर्तनाचा प्रयत्न केल्याचा आरोप करत त्यांनी ही तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार कन्याकुमारीमधील कन्नट्टू विलाई सरकारी उच्च माध्यमिक शाळेत घडला असून विद्यार्थ्याच्या पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे याबाबतची तक्रार दाखल केली आहे.
कन्नट्टू विलाई सरकारी उच्च माध्यमिक शाळेत बीट्राईस थंगम हे टेलरींग आणि शिवणकाम शिकवतात. ते वर्गामध्ये सातत्याने ख्रिस्ती धर्माची महिमा गात असतात आणि हिंदू देवी-देवतांबाबत आक्षेपार्ह टीपण्णी करत असतात असं विद्यार्थ्याने त्याच्या पालकांना सांगितलं होतं. यावर पालकांनी एका हिंदू संघटनेच्या सदस्यांसह शाळा गाठली आणि मुख्यध्यापकांना घडला प्रकार सांगितला. शाळेत कोणती अनुचित घटना होऊ नये यासाठी पोलिसांना बोलावण्यात आलं होतं. सदर घटनेचे शालेय शिक्षा विभागाने चौकशीचे आदेश दिले होते. या चौकशीचा अहवाल लवकरच प्राप्त होईल मात्र तोपर्यंत शिक्षकाला निलंबित केल्याचे तमिळनाडूचे शालेय शिक्षणमंत्री अनबिल महेश यांनी म्हटले आहे.
We have suspended the teacher but awaiting a detailed inquiry (report) on what exactly happened…We have (issued) appointment circulars to all govt schools (on) what steps to be taken…: Anbil Mahesh, Tamil Nadu Education Minister on Kanyakumari Conversion Row pic.twitter.com/AiFY5qaQRv
— ANI (@ANI) April 14, 2022
सदर प्रकरणात पोलीस तक्रार करण्यात आली नाहीये. विद्यार्थ्याच्या पालकांचे म्हणणे आहे की आम्हाला पोलीस तक्रार करायची नाहीये मात्र शालेय शिक्षण विभागाने शिक्षकावर योग्य ती कारवाई केली जावी. विद्यार्थ्याचे वडील हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य आहेत.
























































