
पोस्टाच्या वतीने नागरिकांना 399 रुपयांमध्ये 10 लाख रुपयांचा अपघात विमा उपलब्ध करून दिला जात आहे. सदरचा विमा आपल्या प्रभागातील नागरिकांना सहज उपलब्ध व्हावा म्हणून शिवसेना विभागप्रमुख, आमदार सुनील प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शाखा क्र. 40 च्या वतीने अपघाती विमा पॅम्पचे आयोजन केले होते. त्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
दैनंदिन जीवनात अनेकदा अपघात होऊन नागरिक जायबंदी होतात. त्या पार्श्वभूमीवर पोस्टाकडून नागरिकांना अवघ्या 399 रुपयांचा अपघाती विमा उपलब्ध करून दिला जात आहे. यामध्ये सर्व प्रकारचे अपघात, सर्पदंश, विजेचा शॉक, फरशीवरून घसरून पडणे आदी बाबी कव्हर होतात. त्यामुळे सदरचा विमा आपल्या प्रभागातील नागरिकांना उपलब्ध व्हावा म्हणून पॅम्पचे आयोजन केले होते. तसेच आधार कार्डला मतदार कार्ड लिंक करण्याची सुविधा येथे उपलब्ध करून दिली असून ते पुढे दोन दिवस चालू राहणार आहे. याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आमदार सुनील प्रभू, माजी उपमहापौर सुहास वाडकर, उपविभागप्रमुख काशिनाथ परब यांनी या पॅम्पला घेट देत पाहणी केली. शाखाप्रमुख संदीप जाधव, शाखासंघटक पद्मजा राऊळ यांनी या पॅम्पचे आयोजन केले आहे.


























































