अमरनाथ यात्रेच्या कॅम्पमध्ये पोलिसाने काढला महिलेचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bathroom-video

सामना ऑनलाईन । श्रीनगर

अमरनाथ यात्रेच्या कॅम्पमध्ये आंघोळ करणाऱ्या एका महिलेचा सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसाने व्हिडीओ रेकॉर्ड केल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी तारिक अहमद या पोलिसाला त्रिकुटा पोलिसांनी अटक केली आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार,  तारिक अहमद हा त्याच्या मोबाईलने एका महिलेचे आंघोळ करताना चित्रीकरण करत होता. त्याचवेळी त्या महिलेचे त्याच्याकडे लक्ष गेले व तिने आरडाओरडा केला. त्यानंतर पोलिसांनी व जवानांनी तारिकला अटक केली. तसेच त्याचा मोबाईल जप्त केला.