मोस्ट वॉन्टेड विकास दुबे मध्यप्रदेश मधून अटकेत

2449

उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये गेल्या आठवड्यात आठ पोलिसांची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी कुख्यात गुंड विकास दुबे याला उज्जैन येथे अटक करण्यात आली आहे. विकास दुबे उज्जैनमधील महाकाल मंदिरात गेला होता, तेव्हा तेथील सुरक्षा रक्षकाने त्याला ओळखले. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी कारवाई करत त्याला ताब्यात घेतले.

कानपूरच्या चौबेपूरमधून फरार झालेला विकासने आधी दिल्ली-एनसीआर गाठलं, परंतु पोलिसांच्या प्रचंड संतापानंतर तो पुन्हा मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यात पोहोचला, तेथे त्यांना मध्यप्रदेश पोलिसांनी अटक केली.

दिल्लीत लगतच्या हरियाणामधील फरीदाबादमधील हॉटेलमध्ये आरोपी विकास दुबे मंगळवारी दिसला होता. परंतु पोलीस छापा टाकण्यासाठी तिथे पोहोचले तेव्हा तो तेथून निघून गेला होता. कुख्यात गुन्हेगाराला पकडण्यात गुंतलेल्या स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) सांगितले की फरीदाबादमधील सीसीटीव्हीमध्ये दिसणारी व्यक्ती विकास दुबे आहे. यानंतर गुरुग्राममध्येही हाय अलर्ट देण्यात आला होता.

आपली प्रतिक्रिया द्या