अबब! एका रिक्षात कोंबले 24 प्रवासी, व्हिडीओ व्हायरल

2942
auto-driver

तुम्हाला ‘हेराफेरी’ चित्रपटातील ओम पुरी यांचे एक दृश्य नक्की आठवत असेल, ज्यामध्ये टॅक्सीत इतके लोक बसतात की एका बाजूने माणूस शिरला की दुसऱ्या बाजूने माणूस बाहेर पडतो. तशीच स्थिती व्हावी असा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

एका रिक्षात सर्वसाधरण 3 व्यक्ती आणि पाच वर्षांखालील सोबत 2 मुलं आणि एक रिक्षा चालक बसू शकतात. काही ठिकाणी अनधिकृतपणे रिक्षाचालकाच्या दोन्ही बाजूला दोन लोक बसवतात, म्हणजे एकूण सात लोकं बसतात. पण वाहतूक पोलिसांना एक महाशय असे हाती लागले आहेत की त्याच्या रिक्षात 24 जण बसले होते. एका रिक्षातून मोजून 24 लोकं बाहेर निघतानाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

पाहा व्हिडीओ

तेलंगणातील करीमनगर तिम्मापूर गावातील अब्दुल नावाच्या रिक्षाचालकाला वाहतूक पोलिसांनी अडवले. त्याच्या रिक्षात क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसल्याचा त्यांना संशय आला. त्यांनी किती जण बसले आहेत अशी विचारणा केली आणि एकेकाला बाहेर येण्यास सांगितले. बाहेर पडणारा प्रत्येक प्रवासी पोलिसांनी मोजला तर या रिक्षात दोन-तीन नाही तर तब्बल 24 प्रवासी बसले होते. यानंतर पोलिसांनी रिक्षाचालकाला दम भरला आणि या पुढे असे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरल्यास परवाना रद्द होईल, दंड भरावा लागेल आणि जेलही होऊ शकेल, तेव्हा पुन्हा असे करू नको, अशी तंबी देखील दिली. तसेच प्रवाशांना देखील समज दिली.

पाहा व्हिडीओ

द हंस इंडियाने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले असून या घटनेचा व्हिडीओ तेलंगणचे पोलीस आयुक्त व्ही. बी. कमलासन यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून ट्वीट केला आहे. तसेच असे प्रकार करू नका असे आवाहन देखील केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या