कराड – येराडच्या येडोबा देवाची यात्रा रद्द तालुका प्रशासन व ग्रामस्थांचा निर्णय

महाराष्ट्रसह परराज्यातील लाखों भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री क्षेत्र येडोबा देवाची येत्या 28,29 व 30 एप्रिलला होणारी यात्रा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या संचारबंदी आदेशान्वये रद्द करण्यात आली आहे.यात्रास्थळी येडोबा देवाच्या दर्शनासाठी भाविकांनी येऊ नये, यासाठी मंदीराकडे जाणा-या रस्त्यावर पोलीसांकडून नाकाबंदी करण्यात येणार आहे.मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त राहणार असल्याचे तालुका प्रशासनाच्या आयोजीत बैठकीत माहिती देण्यात आली.

येराड, बनपेठ (ता.पाटण) येथे चैत्र पोर्णिमेला सुरु होणा-या श्री येडोबा देवाच्या यात्रेस लाखोंच्या संख्येने भाविक भक्त हजेरी लावतात.गतवर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर श्री येडोबा देवाची यात्रा रद्द करण्यात आली होती. गत महिन्यापासून कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाल्याने यंदाही यात्रा रद्द केल्याचे प्रशासनाने व ग्रामस्थांनी जाहीर केले आहे. या संदर्भात येडोबा देवाच्या प्रांगणात पाटणचे तहसिलदार टोंपे यांचे अध्यक्षेतेखाली बैठक झाली. यावेळी पाटण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीचौखंडे येराडचे तलाठी शिंदे, बाळासाहेब देसाई कारखान्याचे संचालक राजेंद्र गुरव, देवस्थानचे अध्यक्ष सदानंद साळुंखे, येराडचे सरपंच प्रकाश साळुंखे बनपेठवाडीचे सरपंच आबासो साळुंखे, पोलीस पाटील रवि साळुंखे, बनपेठवाडीचे उपसरपंच निलेश साळुंखे, येराडचे उपसरपंच यशवंत जाधव,बळीराम साळुंखे देवस्थानचे सचिव प्रकाश साळुंखे अनिल साळुंखे,पंढरीनाथ साळुंखे, हणमंत साळुंखे, भरत गुरव, सिताराम साळुंखे, आदींसह पदाधिकारी ग्रामस्थ व पुजारीमंडळी उपस्थित होते.

गतवर्षी प्रमाणेच यात्रा बंदचे काटेकोरपणे नियोजन करुन महाराष्ट्रसह परराज्यातील भाविकांपर्यंत यात्रा बंदचा निरोप पोचवावा व प्रसिध्दी माध्यमातून ही जनजागृती करावी. तसेच गावातील ग्रामस्थांनीही संचारबंदी आदेशान्वये मंदीर परिसराकडे येऊ नये असे आवाहन तहसिलदार टोंपे व पोलीस निरीक्षक चौखंडे यांनी बैठकीत केले.शासनाच्या आदेशान्वये येडोबा मंदीर 30 एप्रिल पर्यंत बंद असून दैनंदिन पुजाआर्चा मर्यादीत पुजा-यांचे हस्ते होतील.तसेच कोरोणाच्या लसीकरणबाबत ही चर्चा होऊन येराड व बनपेठवाडीमधील राहिलेल्या सर्व ग्रामस्थांचे लसीकरण लवकरात लवकर पुर्ण करुन घेण्याबाबत तहसिलदार टोंपे यांनी आवाहन केले.

आपली प्रतिक्रिया द्या