Corona effect जगभरात ‘या’ क्षेत्रातील 5 कोटी नोकऱ्यांवर पडणार बेकारीची कुऱ्हाड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
tour-tour

कोरोना विषाणू मुळे जगभरातील अर्थव्यवस्था संकटात आली आहे. अनेक देशात व्यापार, ठप्प झाले आहेत. त्यात सर्वाधिक फटका बसला तो विमान वाहतूक आणि पर्यटन क्षेत्राला. विशेष म्हणजे विमानतळ हे कोरोना पसारण्याचे मुख्य ठिकाण ठरले. त्यामुळे पर्यटक आता हवाई मार्गाचा वापर टाळत आहेत. अनेक पर्यटन स्थळे बंद करण्यात आली आहेत. ही परिस्थिती पुढील महिनाभर तरी अशीच राहण्याची शक्यता असल्याने या क्षेत्रावर मोठे संकट उभे राहिले असून जगभरात 5 कोटी नोकऱ्या यामुळे जाण्याची शक्यता आहे.

वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझम कौन्सिल (WTTC) ने ही अंदाजित आकडेवारी जारी केली असून 5 कोटी नोकऱ्या संकटात असल्याचे म्हटले आहे. अनेक हवाई कंपन्यांची विमाने विविध विमानतळावर अडकून पडली आहेत. गेल्या काही दिवसात पर्यटकांनी 25 टक्के बुकींग रद्द केली आहेत. विमान कंपन्या आणि टूर ट्रॅव्हल कंपन्या फार काळ लॉक डाउन सहन करू शकणार नाहीत.

WTTC च्या अंदाजानुसार 16 टक्के नोकऱ्यांमध्ये बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. 2018 च्या जागतिक आकड्यानुसार 319 दशलक्ष लोक या क्षेत्राशी जोडले गेले होते. त्यामुळे बेकारीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.