कोल्हापूरात शिवसैनिकांचे रेशन वितरणावर लक्ष, सर्वांना अन्न मिळावं म्हणून दक्ष

722
shivsena-logo-new

weकोरोना विषाणूमुळे लाॅकडाऊनच्या पार्श्र्वभूमीवर सरकारने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयाप्रमाणे, गोरगरिब जनतेसाठी मोफत धान्य पुरवठा योग्य रितीने वितरित व्हावे यासाठी शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी रेशन व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत. आपापल्या भागातील रेशन दुकानांत जाऊन दुकानदारांना सूचना देण्यासह नागरिकांनीही सामाजिक अंतर ठेवूनच संवाद साधत आहेत.

कोरोनामुळे लाॅकडाऊनच्या काळात राज्यात कोणीही उपाशी राहुन नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून अनेक उपाययोजना राबविण्यात येत आहेत.त्यापैकीच गोरगरिबांना तीन महिन्यांसाठी पुरवठा विभागा मार्फत मोफत धान्य पुरवठा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन तसे आदेश काढले आहेत.सध्या या धान्याचा पुरवठा करण्यात येत आहे.पण हे धान्य वितरण व्यवस्थित व्हावे.ज्या-त्या लाभार्थ्यांना मिळावे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना भवनकडुन सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांना सुचना देण्यात येऊ लागल्या आहेत.त्यानुसार ठिकठिकाणी स्थानिक शिवसेना पदाधिकारी स्वयंस्फुर्तीनेही या सुचनांचे पालन करताना दिसत आहेत.

पुरवठाधारक दुकानदाराने योग्य प्रमाणात शासनाने दिलेली धान्य प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहचवावे.प्रत्येक लाभार्थ्याला रेशन आल्याचे रेशन दुकानदाराने कळवावे.संबंधित लाभार्थ्याला जर ते धान्य मिळत नसेल,एखादा दुकानदार आदेशाचा भंग करत असेल तर अशा वेळी शिवसेनेच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. जेणेकरून लाभार्थ्याची गैरसोय होणार नाही. त्याला शासनाने दिलेले धान्य मिळावे हा या पाठीमागचा हेतु आहे.यासाठी करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी उंचगाव मधील रेशन दुकानामध्ये ग्राहकांशी संवाद साधत,रेशन दुकानदारांना सूचना केल्या.करवीर पूर्व भागासह इतर संपूर्ण भागात लाभार्थी रेशन पासून वंचित राहू नये हा यामागचा उद्देश असुन,प्रशासन आणि पोलिसांवरील वाढता ताण पाहता,शिवसैनिकही संकटाच्या या काळात समाज स्वास्थ्यासाठी मदतीला पुढे असल्याचेही राजु यादव यांनी यावेळी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या