
कोरोनामुक्त जिह्यांत आठवी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या असल्या तरी विद्यार्थी उपस्थिती अत्यल्प असल्याचे समोर आले आहे. राज्यातील आठ विभागांत आठवी ते बारावीच्या 34.55 टक्के शाळा सुरू झाल्या असून विद्यार्थी उपस्थिती केवळ 10.41 टक्के इतकीच आहे.
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असलेल्या अमरावती, संभाजीनगर, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, लातूर विभागांतील काही ग्रामीण भागांत आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. मात्र विद्यार्थी उपस्थितीचे प्रमाण नगण्य आहे. राज्यात 12 हजार 725 शाळा सुरू झाल्या असून 8 लाख 98 हजार 894 विद्यार्थ्यांचीच शाळेत उपस्थिती आहे. राज्यात आठवी ते बारावीच्या एकूण 36 हजार 835 शाळा आहेत, तर विद्यार्थ्यांची एकूण संख्या 86 लाख 33 हजार 805 इतकी आहे.
विभागनिहाय शाळेतील उपस्थिती
विभाग एकूण शाळा एकूण विद्यार्थी शाळा सुरू हजेरी
- अमरावती 3482 6,51,002 2089 90,523
- संभाजीनगर 2716 6,94,751 801 60,494
- कोल्हापूर 2197 5,28,156 440 17,967
- नागपूर 1914 3,88,133 1119 94,181
- नाशिक 2431 5,98,928 1132 79,744
- पुणे 2034 4,92,336 381 38,294
- मुंबई 3342 8,68,938 132 7585
- लातूर 603 1,89,317 537 1,21,318
राज्याच्या सर्व भागांतील आणि आर्थिकदृष्टय़ा दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत शालेय शिक्षणाचा अभ्यासक्रम पोहोचविण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईलची सुविधा नसल्याने आणि संभाव्य तिसऱया लाटेच्या धोक्यामुळे शाळा प्रत्यक्ष स्वरूपात सुरू नसल्याने डोअरस्टेप या संस्थेमार्फत स्कूल ऑन व्हीलद्वारे मानखुर्द येथे झोपडपट्टीत राहणाऱया मुलांना ऑफलाइन शिक्षण शिकवले जाते. यामध्ये त्यांच्या चाळीत शिक्षण वाहिनी बस येते.


































































