कोरोना रुग्णांची संख्या घटतेय, 24 तासात आढळले 66 हजारहून अधिक रुग्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुण्गांची संख्या घटताना दिसत आहे. दररोज 70 ते 80 हजारच्या कोरोना रुग्ण सापडत असताना आज 66 हजार 732 रुग्ण सापडले आहेत.

गेल्या 24 तासात देशात 66 हजार 732 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 71 लाख 20 हजार 539 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासात 816 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे एकूण मृतांचा आकडा 1 लाख 9 हजार 150 वर पोहोचला आहे. आतापर्यंत 41 लाख 49 हजार 536 रुग्ण बरे झाले असून 8 लाख 61 हजार 853 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.