कोरोनामुळे पालक गमावलेल्यांसाठी टास्क फोर्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने जिल्हास्तरावर टास्क फोर्स नेमण्याची सूचना केली. त्यानुसार मुंबई उपनगर जिह्यात या कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर हे त्याचे अध्यक्ष आहेत. उपनगरच्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शोभा शेलार या समितीच्या सदस्य सचिव असतील बालकांसाठी जिल्हा स्तरावर कार्यरत यंत्रणांची माहिती पुढीलप्रमाणे आहे.

चाईल्ड हेल्प लाईन; 1098 (24 तास)

  • जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर 022-25232308 / 9702962025
  • जिल्हा बाल संरक्षण कक्ष, मुंबई उपनगर 022-25232308 / 9136899891
  • बाल कल्याण समिती – 1 (मुलुंड ते मानखुर्द) 9967814717
  • बाल कल्याण समिती – 2 (वांद्रे ते दहिसर ) 8779503612