
कोविडच्या संभाव्य तिसऱया लाटेचा मुकाबला करण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत केंद्र आणि राज्य सरकारने 1 हजार 367 कोटी 66 लाख रुपयांची भरीव तरतूद केली आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आज दिली.
केंद्र व राज्य सरकारने ही तरतूद केली आहे. यात केंद्राचा हिस्सा 820 कोटी 77 लाख रुपयांचा तर राज्य सरकारचा हिस्सा 547 कोटी 18 लाख रुपयांचा आहे. मनुष्यबळ, अत्यावश्यक औषधे, यंत्रसामुग्री, चाचणीसाठी किट्स, लहान मुले व नवजात शिशूंसाठी अतिदक्षता कक्ष, ऑक्सिजन, ऑक्सिजनच्या खाटा सज्ज ठेवण्याबरोबरच टेलिमेडिसीनची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.



























































