
मुंबईत कोरोनाची तिसरी लाट पूर्ण नियंत्रणात आली असून पहिल्या आठवड्यानंतर पहिल्यांदाच दिवसभरात दोन हजारांखाली रुग्णनोंद झाली आहे. मुंबईत 24 तासांत करण्यात आलेल्या 34 हजार 301 चाचण्यांमध्ये 1857 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 11 जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत आढळलेल्या नव्या रुग्णांमधील 234 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. दिवसभरात 503 जण कोरोनामुक्त झाल्याने आता मुंबईत 21 हजार 142 सक्रिय रुग्ण राहिले आहेत. दरम्यान, मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी 144 दिवसांवर गेला आहे.






























































