जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी 22 फेब्रुवारी 2021च्या आदेशान्वये जिह्यात रात्री 9 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली होती. परंतु आता या आदेशात अंशतः बदल करून जिह्यात संचारबंदीची वेळ रात्री 10 ते सकाळी 5 अशी करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी कळवले आहे. हा आदेश संपूर्ण रत्नागिरी जिल्हा कार्यक्षेत्रात आज 24 फेब्रुवारी 2021पासून पुढील आदेश होईपर्यंत लागू राहील, असे आदेशात म्हटले आहे.
अंबाबाई आणि जोतिबा मंदिरातील दर्शनाच्या वेळेत बदल
कोरोनाच्या काढत्या संसर्गामुळे अंबाबाई मंदिर आणि जोतिबा मंदिरातील दर्शनाच्या केळेत 25 फेब्रुवारीपासून बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्की दर्शनाची केळ सकाळी 6 ते रात्री 8 अशी केळ होती. ती आता सकाळी 7 ते दुपारी 12 आणि दुपारी 3 ते रात्री 8 अशी करण्यात आली आहे. दुपारी 12 ते 3 या केळेत ही दोन्ही मंदिरं पूर्णपणे बंद असणार आहे.
धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून 155 जणांना कोरोनाची लागण
बुलडाण्यातील जळगाव जामोद तालुक्यातील झाडेगाव या छोटयाशा गावात 155 जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. काही दिवासांपूर्वी गावात सात दिवासांच्या धार्मिक कार्यक्रमाचं गावकऱयांनी आयोजन केलं होतं. या कार्यक्रमातून कोरोनाचा संसर्ग झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
























































