Corona – हम नही सुधरेंगे… ठाणे, संभाजीनगरात भाजी खरेदीसाठी बेफाम गर्दी

11056

कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी आणि कलम 144 लागू करण्यात आलं आहे. मात्र नागरिकांना जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात यासाठी भाज्या, फळे, औषधे, बेकरी, पेट्रोल पंप यांना वगळण्यात आले आहे. नागरिकांच्या सोयीसाठी हे निर्णय घेण्यात आले असले तरी नागरिक मात्र सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत नसल्याचे पाहायला मिळत आहे. ही गंभीर बाब समोर आली आहे.

सामना अग्रलेख – चिंतेचा मतलब काय? भयातून उत्सवाकडे…

 

ठाणे येथे सकाळी भाजी खरेदीसाठी लोकांनी तोबा गर्दी केली. सरकारच्या नियमांचे उल्लंघन केल्याचं इथे दिसत होतं. लोकांनी एकमेकांमध्ये अंतर ठेवले नाही, अनेकांच्या तोंडाला मास्क नव्हतं, कॅश ऐवजी डिजिटल पेमेंट करण्याचं आवाहन देखील लोक पाळत नसल्याचे स्पष्ट दिसत होतं.

संभाजीनगरात देखील परिस्थिती अशीच काहीशी होती.  संभाजीनगरात जाधववाडी भाजी मंडईत संचारबंदी असतानाही नागरिकांनी आज मंगळवारी सकाळी खरेदीसाठी गर्दी केली होती, रविवारी जनता कर्फ्युमुळे काल सोमवारी भाजीपाला अतिशय कमी आला, आज आवक वाढताच नागरिकांच्या अशा उड्या पडल्या.

img-20200324-wa0008_copy_700x450

( छाया-योगेश लोंढे)

माध्यमातून हे वृत्त दाखवल्या नंतर पोलिसांनी कारवाई करत गर्दी कमी केली. मात्र असे प्रकार सुरू राहिल्यास सरकारला आणखी कठोर भूमिका घ्यावी लागेल. त्यामुळे नागरिकांनी संयम पाळणं गरजेचं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या