#Corona अमरावतीमधील 68 तपासणी अहवाल निगेटिव्ह

604

कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी आरोग्य यंत्रणेकडून परदेशातून आलेल्या प्रवाश्यांची तपासणी, होम क्वारंटाईन आदी उपाययोजना होत आहे. पथकांकडून प्रवाश्यांशी संपर्क व पाठपुरावा होत असून, अद्यापपर्यंत अमरावती जिल्ह्यात एकही व्यक्ती कोरोना पॉझीटीव्ह तपासणीत आढळून आला नाही. 25 मार्चपर्यंत पाठविण्यात आलेल्या 68 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब निगेटिव्ह आले आहेत. पाच अहवाल प्रलंबित आहेत.

जिल्हा रुग्णालय व विविध आरोग्य पथकांकडून बाहेरून आलेल्या व्यक्तींचा पाठपुरावा होत असून, आतापर्यंत सुमारे एक हजारावर व्यक्तींची तपासणी झाली आहे. त्यांना होम क्वारंटाईनबाबत निर्देश देण्यात आले आहेत. परदेशातून, तसेच मुंबई- पुणे येथून आलेल्या नागरिकांशी संपर्क साधण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. बाहेरून परतलेल्या नागरिकांनी, तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वत:हून माहिती देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाव्दारे करण्यात आले आहे.

हेल्पलाईनसाठी जिल्हाधिकारी कार्यालय टोल फ्री क्रमांक 1800 233 6396 व संवाद कक्षाचा (0721) 2661355 असा आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाचा दूरध्वनी क्रमांक (0721) 2663337, आपत्ती नियंत्रण कक्षाचा (0721) 2662025, अमरावती महापालिकेचा 8408816166, तर जिल्हा परिषदेचा (0721) 2662591, जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाचा (0721) 2665041, तर पोलीस आयुक्तालय नियंत्रण कक्षाचा (0721) 2551000 असा आहे. राज्य नियंत्रण कक्षाचा (020) 26127694, एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्प कक्ष (020) 27290066 आणि टोल फ्री क्रमांक 104 हा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या