चीन, इटलीनंतर या देशात कोरोनाचा कहर; एकाच दिवशी आढळले 1 हजार रुग्ण, 155 मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

चीनच्या वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या कोरोना नावाच्या विषाणूच्या विळख्यात जगातील 170 पेक्षा जास्त देश आले आहे. आतापर्यंत जगात या विषाणूच्या प्रादुर्भावमुळे 8500 पेक्षा लोकांचा मृत्यू झाला असून जवळपास 2 लाख लोकांना याची लागण झाली आहे. चीन नंतर इटली, इराण आणि स्पेन या देशांमध्ये कोरोनाने कहर केला असून यामध्ये आणखी एका देशाचे नाव जोडले गेले आहे. कोरोनाचे पुढील लक्ष्य अमेरिका असू शकते.

अमेरिकेतील न्यूयॉर्क या शहरामध्येच एकाच दिवसात तब्बल 1000 रुग्ण आढळले आहेत. अमेरिकेत आतापर्यंत 9 हजार पेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली असून 150 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. येत्या काही दिवसात कोरोना बाधित लोकांची संख्या 10,000 पर्यंत जाऊ शकते, अशी शक्यता न्यूयॉर्कचे मेयर बिल डे ब्लासियो यांनी वर्तवली आहे.

कोरोनाव्हायरसचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशांमध्ये सध्या अमेरिका सहाव्या क्रमांकावर आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची 9464 प्रकरणे समोर आली आहेत, तर 155 जणांचा मृत्यू झाला आहे.

screenshot_2020-03-19-19-32-51-201_com-android-chrome

अमेरिकेतील न्यूयॉर्क शहर कोरोनाव्हायरसमुळे सर्वात जास्त प्रभावित आहे. शहरात सर्वात जास्त 2,900 रुग्ण आहेत, तर 21 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात एकाच दिवसात 1000 रुग्ण आढळून आलेत. येत्या काही दिवसात हे प्रमाण झपाट्याने वाढेल असे म्हणत, बिल डे ब्लासियो यांनी सावध केले आहे. तसेच कोरोना व्हायरसला आळा घालण्यासाठी सरकारने तात्काळ पावले उचलावीत, असे आवाहन त्यांनी केले आहे.