लातूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 17 हजाराच्या पार

लातूर जिल्ह्यातील कोरानाबाधित रुग्णांचा आकडा आता 17 हजार पार झाला आहे. जिल्ह्यात नव्याने 255 रुग्ण कोरानाबाधित आढळून आलेले आहेत. तर उपचारादरम्यान 10 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाने जाहिर केलेले आहे.

लातूर जिल्ह्यात नव्याने 255 कोरोनाबाधित आढळून आलेले आहेत. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 17061 वर पोहंचलेली आहे. उपचारादरम्यान 10 रुग्णांचा मृत्यू झालेला आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत 486 जणांचा मृत्यू झालेला आहे. सध्या जिल्ह्यात 2814 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. उपचाराने बरे होऊन आज 278 रुग्ण घरी गेलेले आहेत तर आजपर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 13761 वर पोहंचलेली आहे. लातूर जिल्ह्याचा रुग्ण बरे होण्याचा दर हा 80.65 टक्के एवढा झालेला आहे. तर जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचा दर हा 2.8 टक्केवर आलेला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या