कोरोनामुळे राज्यातील विविध कारागृहातून 2 हजार 856 बंदीवानांची सुटका

808

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध कारागृहातून तब्बल 2 हजार 856 बंदीवानाची तात्पुरत्या जामिनावर सुटका करण्यात आली आहे. दरम्यान कारागृह विभाग जवळपास 8 हजार बंदीवान टप्याटप्याने सोडले जाणार आहेत.

कोरोनाने देशभरात थैमान घातले असून आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी लॉकडाऊन करण्यात आले यापार्श्वभूमीवर कारागृहात असणाऱ्या बंदीवानांना सोडण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानुसार कारागृहात संख्येपेक्षा अधिक कैद्यांना तातडीने पॅरोल आणि तात्पुरत्या जामीनावर सोडावे असे आदेश न्यायालयाने दिले होते. ज्यातील विविध कारागृहातून बंदी सोडण्यात येत आहेत. 27 मार्च पासून 4 एप्रिलपर्यंत 2 हजार 856 बंदी सोडले आहेत.

त्यापैकी देशविरोधी कारवाया, पोस्को, अंडर ट्रायल आणि शिक्षा भोगणारे कैदी याना वगळण्यात आले आहे. मात्र त्यानंतर देखीलही कारागृहात मर्यादेपेक्षा अधिक कैदी आहेत. राज्यात कारागृहांची बंदी क्षमता ही 24 हजार आहे. परंतु जवळपास 35 हजाराहून अधिक बंदी कारागृहात आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार पाच वर्षाखालील शिक्षा असणारे तसेच किरकोळ गुन्ह्यातील कैदी सोडले जात आहेत. देशभरातील 11 हजार बंदी न्यायालयाच्या आदेशानुसार जामिनावर बाहेर येणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर पुन्हा त्यांना तुरुंगात बोलविले जाणार आहे.

राज्यातील कारागृहातील कैदी संख्याच्या स्थिती पाहता प्रशासन 8 हजार बंदी सोडण्याचे नियोजन करत आहे. तर अजून शिक्षा झालेले कैदी देखील सोडण्यासाठी कारगृह प्रशासन न्यायालयात प्रयत्न करत आहे.

सोडण्यात आलेले बंदिवान

येरवडा मध्यवर्ती कारागृह- 202
सातारा जिल्हा कारागृह- 31
कोल्हापूर जिल्हा कारागृह- 45
कोल्हापूर सेंटर कारागृह- 46
सांगली जिल्हा कारागृह- 32
सोलापूर जिल्हा कारागृह- 52
नगर जिल्हा कारागृह- 27
संभाजीनगर सेंटर कारागृह- 88
नाशिकरोड सेंटर कारागृह- 81
धाराशिव जिल्ह्य कारागृह- 19
लातूर जिल्हा कारागृह- 34
नांदेड जिल्हा कारागृह- 00
परभणी जिल्हा कारागृह- 67
बीड जिल्हा कारागृह- 18
जालना जिल्हा कारागृह- 23
जळगाव जिल्हा कारागृह- 64
भुसावळ जिल्हा कारागृह- 20
धुळे जिल्हा कारागृह- 35
नागपूर जिल्हा कारागृह- 7
मुंबई सेंटर कारागृह- 410
ठाणे सेंटर कारागृह- 284
तळोजा सेंटर कारागृह- 245
कल्याण जिल्हा कारागृह- 114
भायखळा जिल्हा कारागृह- 114
भायखळा महिला कारागृह- 34
अलिबाग जिल्हा कारागृह- 9
रत्नागिरी जिल्हा कारागृह- 28
सावंतवाडी जिल्हा कारागृह- 8
नागपूर सेंट्रल कारागृह- 129
अमरावती सेंट्रल कारागृह- 140
बुलढाणा जिल्हा कारागृह- 33
अकोला जिल्हा कारागृह- 105
वाशीम जिल्हा कारागृह- 17
यवतमाळ जिल्हा कारागृह- 52
वर्धा जिल्हा कारागृह- 92
चंद्रपूर जिल्हा कारागृह- 97
भांडार जिल्हा कारागृह- 46
एकूण- 2 हजार 856

आपली प्रतिक्रिया द्या