
एकीकडे मध्य आणि पश्चिम रेल्वेने आपल्या लांब पल्ल्याच्या गाडय़ांना प्रवाशांच्या संख्येअभावी रद्द केले असताना एसटी महामंडळाच्या फेऱ्याही प्रवाशांच्या संख्येअभावी रद्द झाल्याने महामंडळाला 3 कोटी 17 लाखांचे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे.
एसटी महामंडळाच्या सर्व विभागांत 16 मार्च रोजी 9,262 फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे 1 कोटी 28 लाख 67 हजार 500 रुपयांचा आर्थिक फटका बसला. तर 11 मार्च 2020 पासून महामंडळाच्या एकूण 20,957 फेऱ्या रद्द झाल्याने एकूण महामंडळाचे 3 कोटी 17 लाख 66 हजार 494 रुपयांचे उत्पन्न बुडाले असल्याचे सूत्रांनी सांगितले.



























































