दिलासादायक वृत, कोरोनाविरोधात तीन वर्षाच्या चिमुकलीचा लढा यशस्वी

1394
corona-virus-new-keral

कोरोनामुळे देशातील रुग्णांची संख्या वाढत असताना दिलासादायक वृत्त आहे. कोरोना झालेल्या एका कुटुंबातील तीन वर्षांच्या चिमुकलीने रोगावर मात केली आहे. कल्याण – डोबिंवली महापालिका क्षेत्रात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव झालेले एकूण 5 रुग्ण आढळून आले आहेत. त्या सर्वांना कस्तुरबा रुग्णालय दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. त्या कुटुंबामधील चिमुकली ही ठणठणीत बरी झाली आहे.

चिमुकलीसह एका रुग्णाचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती कल्याण डोंबिवली महापालिका वैद्यकिय आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.

ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ
ठाणे जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यातच बुधवारी ठाणे, कल्याण ग्रामीण आणि नवी मुंबईत प्रत्येकी एक असे तीन नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या 14 वर पोहोचली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पर्यटनासाठी अथवा काही कामानिमित्त विदेशात गेलेले व तेथून परतलेल्या 3 हजार 123 नागरिकांना 14 दिवस डॉक्टरांच्या निगराणी खाली ठेवण्यात आले आहे. तर 79 पर्यटकांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्यांना मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. तर, 190 पर्यटकांनी निगराणीखालील 14 दिवसांचा कार्यकाळ पुर्ण केला असल्याची माहिती आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या