
देशवासियांना कोरोनाची लस मोफत मिळेल असे वक्त्यव्य केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केले होते. पण अवघ्या काही तासांतच त्यांनी आपल्या वक्तव्यावरून घुमजाव करत कोरोना योद्ध्यांना ही लस मोफत मिळेल असे म्हटले आहे.
In 1st phase of #COVID19Vaccination free #vaccine shall be provided across the nation to most prioritised beneficiaries that incl 1 crore healthcare & 2 crore frontline workers
Details of how further 27 cr priority beneficiaries are to be vaccinated until July are being finalised pic.twitter.com/K7NrzGrgk3— Dr Harsh Vardhan (@drharshvardhan) January 2, 2021
संपूर्ण देशात कोरोना लशीची ड्राय रन सुरू आहे. यावेळी केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन पाहणीसाठी जीटीबी रुग्णालयात पोहोचली होते. तेव्हा पत्रकारांनी त्यांना विचारले की दिल्लीत मोफत लस मिळत आहे. तेव्हा डॉ. हर्षवर्धन म्हणाले की दिल्लीतच नाही तर संपूर्ण देशात मोफत कोरोनावरील लस दिली जाईल.
परंतु या वक्तव्यावरून घुमजाव करत मंत्री म्हणाले की, पहिल्या टप्प्यात संपूर्ण देशात गरजवतांना कोरोनाची लस दिली जाईल. त्यात दोन कोटी कोरोना योध्यांना कोरोनाची लस दिली जाईल. त्यानंतर 27कोटी लोकांना कोरोनाची लस दिली जाईल. ही प्रक्रिया जुलैपर्यंत संपन्न होईल असे हर्षवर्धन यांनी सांगितले.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रलाल सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात एकूण 116 जिल्ह्यांत 256 ठिकाणी कोरोना लशीचे ड्राय रन करत आहेत. केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी स्वतः दिल्लीच्या जीटीबी रुग्णालयात जाऊन ड्राय रनचा आढावा घेतला.
यावेळी हर्षवर्धन म्हणाले के, लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. लशीसंदर्भात सुरक्षा पुरवणे ही आमची प्राथमिकता आहे. जेव्हा पोलियोची लस देण्यास सुरूवात केली होती तेव्हाही अनेक प्रकारच्या अफवा पसरल्या होत्या. परंतु लोकांनी आपल्या बाळांना ही लस पाजली आणि हा देश पोलियोमुक्त झाल्याचे त्यांनी सांगितले.
I appeal to people not to pay heed to rumours. Ensuring safety & efficacy of vaccine is our priority. Different kinds of rumours were spread during polio immunisation but people took the vaccine & India is now polio-free: Union Health Minister Harsh Vardhan on COVID-19 vaccine pic.twitter.com/Ig1fThd0Gc
— ANI (@ANI) January 2, 2021



























































