कोरोनाचा शेअर बाजारालाही फटका, 2357 अंकांनी सेन्सेक्स कोसळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
share-market-fall

कोरोना वायरस आणि येस बँकेच्या प्रकरणामुळे सोमवारी शेअर बाजाराला मोठा फटका बसला आहे. सेन्सेक्स 2357 अंकांनी कोसळला आहे. तसेच निफ्टीही 600 हून अधि अंकांनी कोसळला आहे. असे असले तरी येस बँकेच्या शेअर्समध्ये 34 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

आज शेअर बाजार  सर्वाधिक अंकांनी कोसळला आहे. यापूर्वी 24 ऑगस्ट 2015 रोजी सेन्सेक्स 1624 अंकांनी कोसळला होता. शेअर बाजारात एवढ्या मोठ्या अंकांनी कोसळल्याने गुंतवणुकदारांचे धाबे दणाणले आहे.

सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 1169.74 अंकांनी कोसळून 36,406.88 वर पोहोचला होता. तर निफ्टि 332.40 अंकांनी कोसळून 10,657.05 वर आला होता.  येस बँकंचे शेअर मजबुतीने उघडएल होते आणि 20 टक्क्यांनी पुढे गेला होता. सध्या येस बँकेंचे शेअरस 34 टक्क्यांनी वधारले आहेत. दुपारी सेनेस 2200 अंकांनी कोसळला होता.