केंद्र सरकारचेही ‘वर्क फ्रॉम होम’; 50 टक्के कर्मचारी घरातून काम करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना विषाणूच्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गुरुवारी मोठा निर्णय घेतला. बी आणि सी श्रेणीतील 50 टक्के कर्मचाऱयांनी नियमित कार्यालयात हजर राहायचे, तर उर्वरित 50 टक्के कर्मचाऱयांनी घरातून काम करावे, असा आदेश केंद्र सरकारने जारी केला आहे. कर्मचाऱयांच्या कामाच्या वेळेतही बदल केला जाण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारच्या मनुष्यबळ मंत्रालयातर्फे यासंदर्भात आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार सरकारी कार्यालयांतील 50 टक्के कर्मचारी आठवडाभर कार्यालयात येतील तर ते कर्मचारी पुढच्या आठवडय़ात घरातून काम करतील. तशाच पद्धतीने घरातून काम करणारे 50 टक्के कर्मचारी पुढच्या आठवडय़ात कार्यालयात हजर राहून काम करतील. या रोटेशन डय़ुटीचे वेळापत्रक बनवून काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना सर्व विभागप्रमुखांना देण्यात आल्या आहेत.

  • कार्यालयापासून जवळच्या परिसरात राहणाऱया कर्मचाऱयांना कार्यालयात ये-जा करण्यासाठी स्वतŠची गाडी वापरण्याच्या सूचना केल्या आहेत.
  • जे कर्मचारी कोरोनाचा फैलाव आटोक्यात आणण्याच्या मोहिमेत कार्यरत आहेत त्या कर्मचाऱयांना रोटेशन डय़ुटी लागू नाही.
  • कर्मचाऱयांचे तीन गट बनवले जातील. तसेच सकाळी 9 ते सायंकाळी 5.30, सकाळी 9.30 ते सायंकाळी 6 वाजता आणि सकाळी 10 ते सायंकाळी 6.30 अशा डय़ुटीच्या तीन वेळा असतील, असे मंत्रालयाने म्हटले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाच्या कंट्रोल रूममध्ये रोज एक हजार कॉल्स, 400 ई-मेल्स

कोरोनाशी लढण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या कंट्रोल रूममध्ये 25 ते 30 लोक काम करीत आहेत. कंट्रोल रूमकडे रोज जवळपास 400 ई-मेल्स तसेच एका हजार फोन कॉल्स येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सार्क देशांचे नेते यांच्यातील व्हिडीओ कॉन्फरन्सिंगदरम्यान जाहीर केल्या गेलेल्या प्रस्तावांवर पुढील कार्यवाही केली जात आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी स्पष्ट केले.