भाजीपाल्याच्या ट्रकमधून 40 मजुरांचे चोरी चुपके ठाणे टू युपी

396

कोरोनाची दहशत, त्यात 21 दिवसाचे लाॅकडाऊन यामुळे गड्या आपला गाव बरे असे म्हणत मूळगावी किंवा राज्यात जाण्यासाठी तिथले मूळ रहिवासी नवनवीन शक्कल लढवत आहेत. ट्रेनसह सार्वजनिक वाहतूक बंद असल्यामुळे आता जीवनावश्यक वस्तूंचे लेबल असलेल्या ट्रक, टेम्पो मधून बेकायदा वाहतुकीला जोर चढला असल्याचे ठाण्यात उघडकीस आले आहे. कोपरी पोलिसांनी भाजी पाल्याच्या ट्रकमधून युपीला पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या अशा 40 मजुरांना पकडले आहे. गेल्या तीन दिवसापासून उपासमार होत असल्याने ते गावी जात होते.

ठाण्यातील कोपरी पोलिसांनी आज नाका बंदीत एका भाजी पाल्याच्या ट्रक मधून प्रवास करणाऱ्या 40 जणांना पकडले. हे लोक युपीला लपून जात होते. कोपरी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून, ट्रक ड्राव्हर व चालकावर कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. युपीला जाणारे हे सर्व गेले तीन दिवस उपाशी होते . हे कळताच पोलिसांनी त्यांच्या जेवणाची व्यवस्था केल्याचे कोपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्त गावडे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या