
लॉकडाऊनमूळे बाहेर जिल्ह्यासह बाहेरील राज्यातील अनेक नागरिक चंद्रपूरात अडकून आहेत. मागील महिणाभरापासून अशांना मदत आमदार जोरगेवार यांच्या कडून मदत पोहचवीली जात आहे. आमदार किशोर जोरगेवार यांना चंद्रपूरात अडकुन असलेल्या आंध्र प्रदेश व तामिळनाडू राज्यातील 160 विध्यार्थी चंद्रपुरात अडकून असल्याची माहिती मिळतात त्यांनी विद्यार्थ्यांची विचारपूस करत चांदा ब्रिगेडच्या वतीने तिन क्विंटल तांदूळ पोचविण्यात आले.
संचारबंदीमुळे अनेक कुटुंब अडचणीत आले आहे. या कुटुंबाच्या मदतीसाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने मागील महिणाभरापासून प्रयत्न केले जात आहे. चंद्रपूरकरांसह चंद्रपूरात अडकलेल्यासांठीही यंग चांदा ब्रिगेड मदतीचा हात पुढे करत आहे. दरम्याण आध्र प्रदेश व तामिळनाडू राज्यातील 160 विद्यार्थ्यी शिक्षणासाठी चंद्रपूरात आले होते. मात्र अचानक लॉकडाऊन करण्यात आल्याने हे विदयार्थी चंद्रपूरातच अडकुन आहेत. मात्र आता त्यांच्या जवळ असलेले राशन व पैसे संपल्याने ते अडचणीत सापडले होते. या विद्यार्थ्यांना आमदार किशोर जोरगेवार यांनी मदतीचा हात पुढे केला. कार्यकर्त्यांना सुचना देत क्षणाचाही विलंब न करता यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने या विद्यार्थ्यांना मदत केली करण्यात आली. या विदयार्थ्यांच्या मागणी नूसार त्यांना तिन क्विंटल तांदूळ देण्यात आले असून पूढेही मदत लागल्यास त्यांना मदत करण्याचे आश्वासन यावेळी आमदार जोरगेवार यांच्या वतीने देण्यात आले आहे.































































