कफ परेड ते शिर्डी; 115 दिवसांचा मदत यज्ञ, 5 लाखांहून अधिक जणांना अन्नधान्य वाटप

419

कोरोनाच्या काळात अनेकजण मदतीसाठी पुढे आले. पण या काळात एक असा अवलिया सध्या समोर आलाय ज्याने मदतीसाठी परदेशात आपला व्यवसाय वाढावा, यासाठी जमा केलेली तब्बल 25 वर्षांची बचत देऊ केली. गेल्या 115 दिवसांच्या सुरु असलेले या मदत यज्ञाात आतापर्यंत पाच लाखांहून अधिक जणांना मदत करण्यात आली आहे. ‘मौरिस नोरोन्हा असे या अवलियाचे नाव असून मुंबईतील बोरिवली परिसरात ते राहतात. मुख्य म्हणजे त्यांचे हे मदत कार्य फक्त मुंबई आणि उपनगरापुरता मर्यादित न राहता पुढे शिर्डी ते अहमदनगरपर्यंत पोहचलले आहे.

22 मार्चपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास कफ परेड ते विरार, बोईसर, पालघर तसेच ठाणे, नवी मुंबई आणि त्यानंतर पुणे, नाशिक, शिर्डी आणि अहमदनगरपर्यंत ते संपूर्ण मुंबई त्यांनी आपले मदतीचा यज्ञ सुरु ठेकला आहे. ज्यात गरजूंना महिनाभर पुरेल इतकं मोठय़ा प्रमाणात रेशन किट मोफत वाटले.

यांना दिला मदतीचा हात

मौरीस यांनी यावेळी अनेकांना मदत केली. त्यात स्थलांतरित, अपंग गट, ट्रान्स जेंडर, रुग्णवाहिका चालवणारे, पोलिस कर्मचारी, बेस्ट चालक, पत्रकार, मासेमारी करणारे कामगार आणि ग्रामस्थ, ऑटो रिक्षाचालक, सुरक्षा कर्मचारी, गृहनिर्माण संस्था, ज्येष्ठ नागरिक आणि बऱयाच गरजूंना त्यांनी मदत केली. त्याशिवाय मीरा रोड येथील बारमध्ये काम करणाऱया व आर्थिकदृष्टय़ा सक्षम नसलेल्या मुलींनाही त्यांनी मदत केली.

आपली प्रतिक्रिया द्या