कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे चंद्रपुरात आठ दिवस सराफा बाजार बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रारंभीच्या काळात सुरक्षीत मानला गेलेला चंद्रपूर जिल्हा आता कोरोना रुग्णवाढीत झेप घेत असल्यानं सराफा व्यावसायिकांनी आठ दिवस दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय.

जिल्ह्यात कोरोनाचे रोज सरासरी 250 रुग्ण वाढत आहेत. एकूण रुग्णांचा आकडा तीन हजारांवर गेलाय. कोरोनाची वाटचाल आता समूह संसर्गाकडे सुरू असल्यानं प्रशासन जनता कर्फ्यु लावण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र त्यापूर्वीच सराफा व्यापारी संघटनेनं येत्या बुधवारपासून पुढच्या बुधवारपर्यंत जिल्ह्यातील सर्व सराफा दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. हा निर्णय सर्वांच्या आरोग्यासाठी घेतला असून, त्यावर काटेकोर अंमल केला जाणार आहे, अशी माहिती सराफा व्यापारी संघटनेनं दिली.