अनुदानासाठी 22,048 रिक्षाचालकांचे अर्ज आले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

कोविड काळात व्यवसाय ठप्प असल्याने राज्य सरकारने परवानाधारक रिक्षा चालक आणि मालकांना 1500 रुपये अनुदान जाहीर केले आहे. रविवारपासून अनुदान थेट खात्यावर जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली होती, परंतु काही तांत्रिक कारणांमुळे अडचणी आल्या. सोमवारी अर्ज करण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली असून सायंकाळपर्यंत 22,048 जणांचे अर्ज यशस्वी झाले आहेत. मोटार परिवहन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर परवाना धारक ऑटोरिक्षाचालकांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी पोर्टलची निर्मिती केली होती. रविवारपासून ही प्रक्रिया सुरू झाली होती, आतापर्यंत राज्यातून 22,048 रिक्षाचालकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत, असे डेप्युटी आरटीओ संदेश चव्हाण यांनी सांगितले.