
सामना प्रतिनिधी । मुंबई
मागील साडेतीन वर्षांपासून रखडलेल्या महामंडळांच्या नियुक्त्यांना अखेर मुहूर्त सापडला. परदेशदौऱ्यावर जाण्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामंडळांच्या नियुक्त्यांची फाइल क्लिअर करून ती महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांकडे सोपवली. त्यानुसार कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी संजयकाका पाटील, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी कोल्हापूरचे डॉ. योगेश प्रतापसिंह जाधव यांची नेमणूक करण्यात आली आहे. यांच्यासह महामंडळांवरील चार नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज चार मंडळांकरील सदस्यांच्या नियुक्तीची माहिती दिली. राज्यातील महामंडळाकर शक्यतो खासदाराऐकजी आमदाराची नेमणूक केली जाते. मात्र भाजपने कृष्णा खोरे महामंडळाकर संजयकाकांची नियुक्ती करून किधानसभा निकडणुकीसाठी त्यांच्याकर सांगली आणि आजूबाजूच्या परिसराची जबाबदारी टाकली आहे. या नियुक्तीमुळे पाटील हे आगामी काळात दिल्लीऐकजी राज्याच्या राजकारणात परततील असे आडाखे बांधले जाणार आहेत. मंत्रीपदाच्या स्पर्धेत असलेले बुलढाणा जिह्यातील मलकापूरचे आमदार चैनसुख संचेती यांची किदर्भ कैधानिक किकास मंडळाच्या अध्यक्षपदी तर किदर्भ पाटबंधारे किकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी अमराकतीचे आमदार डॉ. सुनील देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
































































