लग्नानंतर सात वर्षांनी एकाच वेळी चार बाळांना दिला जन्म

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लग्नानंतर सुमारे सात वर्षे घरात पाळणा हलला नाही म्हणून दु:खात वावरणाऱ्या प्रियांका आणि शंकरलाल किरण या छत्तीसगढमधील कोरबाच्या कोसबाडी जिह्यातील दाम्पत्यावर विधात्याने एकाच वेळी चार-चार बालकांचा वर्षाव केला आहे. चारही नवजात बालके आणि त्यांची आई खुशाल असल्याचे वृत्त आहे. पेशाने शिक्षक असलेल्या शंकरलाल यांना लग्न होऊन सात वर्षे अपत्य नव्हते. त्यामुळे ते सतत उदास असायचे. पण आता सात वर्षाने त्यांच्यावर अपत्यप्राप्तीच्या आनंदाचा चौफेर वर्षाव नियतीने केला आहे. जन्म घेणाऱ्या नवजात बालकांत तीन कन्या आणि एक पुत्र अशा चौघांचा समावेश आहे.