मेट्रोमध्ये जोडप्याचे अश्लील चाळे, सीसीटीव्ही फुटेज पॉर्न साईटवर व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सार्वजनिक ठिकाणी प्रेमी युगुलांकडून होणारे अश्लील चाळे रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होऊनही असे प्रकार सर्रास होतात. पण, मेट्रो स्थानकात जोडप्याने केलेल्या अश्लील कृत्यांचे सीसीटीव्ही फुटेज पॉर्न बेवसाईटवर व्हायरल झालं आणि एकच खळबळ उडाली.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्ली येथील एका मेट्रो स्थानकावर 18 जुलै रोजी एका प्रेमी युगुलाने अश्लील चाळे केले. तिथल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ते रेकॉर्डही झाले. कंट्रोल रूममध्ये सुरू असलेल्या लाईव्ह रेकॉर्डिंगवरून कोणीतरी ते मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलं आणि पॉर्न वेबसाईटवर व्हायरल केलं. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चांगलीच खळबळ उडाली. अगदी काही वेळातच त्या व्हिडीओला लाखांहून अधिक व्ह्युज मिळाले. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात जोडप्याविरुद्ध सार्वजनिक ठिकाणी अश्लीलतेचा प्रचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

हा व्हिडीओ लाईव्ह रेकॉर्डिंगवरून व्हायरल झाला आहे. त्यामुळे कंट्रोल रूमच्या सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह उभं राहिलं. या घटनेमुळे सार्वजनिक सभ्यतेच्या प्रश्नावर चर्चांना उधाण आलं आहे.