अशीच रुग्ण संख्या कमी राहिली तर शाळा सुरू करण्याचा विचार, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत होणार चर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचा संसर्ग वाढल्याने बंद करण्यात आलेल्या शाळा आता रुग्ण संख्या कमी होत असल्याने सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे. या मागणीबाबत राज्य सरकार विचार करीत असून येत्या काही दिवसांत जर रुग्ण संख्या अशीच कमी होत राहिली तर शाळा सुरू करण्यास काहीच हरकत नाही. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, शाळा सुरू करण्याबाबत येत्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा केली जाईल व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर निर्णय घेतील. याबाबत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही येत्या आठ ते दहा दिवसांत मुख्यमंत्री निर्णय घेतील, असे सांगितले. रुग्णसंख्या घसरत राहिल्यास मुंबईतील शाळा सुरू करण्यास काहीच हरकत नाही, त्याबाबत विचार केला जाईल, अशी प्रतिक्रिया मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली.