भाजपवाले मला गाय देतील का? ओवैसी यांचा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । हैदराबाद

देशात विविध राज्यांमध्ये निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे प्रचारसभांतून आरोपप्रत्यारोप सुरू आहेत. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपवर टीका केली आहे. भाजपने आपल्या वचनानाम्यात 1 लाख गायी दान करणार असल्याचे म्हटले आहे. त्या मुद्द्याला हात घालत ओवैसी यांनी भाजपला लक्ष्य केलं आहे.

तेलंगणात 7 डिसेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान घेण्यात येणार आहे. त्याआधी भाजपने आपला वचननामा प्रसिद्ध केला असून राज्यात 1 लाख गायी दान करणार असल्याचे म्हटले आहे. भाजप हे वचन खरोखर पाळणार आहे का? मलाही गाय दान करणार का? तसं जर होणार असेल तर मी अत्यंत आदराने त्या गायीचा सांभाळ करेन असं असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं आहे. तसेच ते मला गाय देतील का? असा प्रश्न त्यांनी केला आहे.