चंद्रपूर प्रिमीअर लीग (CPL)ला शानदार प्रारंभ, मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन

700

चंद्रपूर जिल्ह्याची ओळख बनलेल्या चंद्रपूर प्रीमीअर लीग (CPL) या लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेला मंगळवारपासून स्थानिक पोलिस फूटबॉल मैदानावार सुरुवात झाली. या प्रसंगी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते व वेकोली महाप्रबंधक आभासचंद्र सिंग यांच्या उपस्थितीत CPL च्या सिझन-7 चे उद्घाटन थाटात पार पडले.

मंगळवारपासून 2 फेब्रुवारीपर्यंत ही स्पर्धा खेळविली जाणार आहे. या स्पर्धेमधे 16 टीम असुन 256 खेळाडुचा सहभाग आहे. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक 1 लाख 11 हजार आणि द्वितीय पारितोषिक 66 हजार रुपये इतके आहे. याशिवाय वैयक्तिक पारितोषिकेही यात देण्यात येणार आहेत. आयपीएलच्या धर्तीवर प्रत्येक संघाला वेगवेगळया रंगाचे पोशाख देण्यात आले असून स्पर्धा निकोप व्हावी, यासाठी आंधप्रदेश क्रिकेट असोसिएशनचे पंच बोलावण्यात आले आहेत. ही स्पर्धा पांढऱ्या चेंडुने खेळवली जात आहे. दिवसाला दोन सामने होणार आहेत. या स्पर्धेचे लाईव्ह अपडेट सीपीएलच्या फेसबुक पेजवरही उपलब्ध करण्यत आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या