धोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला का आला? गौतमचा ‘गंभीर’ सवाल

राजस्थान रॉयल्सकडून मिळालेल्या 217 धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. तोपर्यंत सामना हातामधून निसटून गेला होता. यावर हिंदुस्थानचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने टीम इंडियाच्या माजी कर्णधाराला खडेबोल सुनावले. तो म्हणाला, पॅप्टन लीडिंग फ्रॉम द प्रंट असे म्हटले जाते. 217 धावांचा पाठलाग करताना महेंद्रसिंग धोनी सातव्या स्थानावर फलंदाजीला येतो हे समजण्यापलीकडे आहे.

ऋतुराज, करण, केदार तुझ्यापेक्षा ग्रेट आहेत का?

यंदाच्या मोसमात सुरेश रैना चेन्नई सुपरकिंग्ससाठी खेळत नाही. यामुळे महेंद्रसिंग धोनीच्या खांद्यावरील जबाबदारी आणखी वाढते. त्याने सुरुवातीच्या क्रमांकावर फलंदाजी करायला यायला हवे होते. नवख्या तसेच अनुभवाने कमी असलेल्या खेळाडूंना त्याने पुढे केले. सॅम करण, ऋतुराज गायकवाड, केदार जाधव हे तुझ्यापेक्षा ग्रेट आहेत का, असा सवालही गौतम गंभीरने महेंद्रसिंग धोनीला केला आहे.

ते तीन षटकार स्वतःसाठीच

महेंद्रसिंग धोनीने अखेरच्या षटकांत तीन षटकार मारले. ते काय उपयोगाचे. तोपर्यंत लढत गमावली होती. स्वतःच्या धावा वाढवण्यासाठी त्याचा फायदा झाला, असेच म्हणावे लागेल. इतर कोणत्या कर्णधाराने सातव्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असता तर त्याच्यावर टीका करण्यात आली असती. महेंद्रसिंग धोनीबद्दल कोणी बोलत नाही, असा प्रश्नही यावेळी गौतम गंभीरकडून उपस्थित करण्यात आला आहे.

14 दिवसांच्या क्वारंटाइन कालावधीवर पह्डले खापर

दरम्यान, कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने या पराभवाचे खापर क्वारंटाइन कालावधीवर पह्डले आहे. यूएईत आल्यानंतर संघातील 13 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यानंतर आणखी काही दिवस क्वारंटाइनमध्ये राहावे लागले. या 14 दिवसांच्या कालावधीमुळे फलंदाजीचा सराव करता आला नाही, असे स्पष्टीकरण महेंद्रसिंग धोनीकडून यावेळी देण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या