कोरोनामुळे क्रिकेटचा नियम बदलणार?, गोलंदाजाना बॉलला थुंकी लावण्यास मनाई

1917

कोरोनाचा प्रकोप ओसरल्यावर क्रिकेटपटू मैदानावर उतरतील , तेव्हा गोलंदाजावर काही निर्बंध येण्याची शक्यता आहे. गोलंदाजी करण्यापूर्वी गोलंदाज बॉल घासून स्वच्छ करतात. तो अधिक गुळगुळीत करण्यासाठी घासतात. अनेक गोलंदाज बॉलला थूंक लावून तो चमकवतात आणि त्यानंतरच गोलंदाजी करतात. गोलंदाजासाठी बॉलची स्वच्छता करणे आणि तो चमकवणे गरजेचे असते. मात्र, कोरोनामुळे गोलंदाजाना अशाप्रकारे बॉल चमकवता येणार नाही.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गोलंदाजांना बॉलला थुंक लावता येणार नाही. त्याऐवजी बॉल स्वच्छ करण्यासाठी आणि चमकवण्यासाठी कृत्रीम पदार्थ देण्याच्या पर्यायावर विचार करण्यात येणार आहे. मात्र, अशाप्रकारे कृत्रीम पदार्थ दिल्यास बॉलशी छेडछाड करण्याच्या नियमाचे उल्लंघनाची समस्या उभी ठाकणार आहे. बॉल चमकवण्यासाठी कृत्रीम पदार्थ देण्याचा पर्याय स्विकारायचा असल्यास, बॉलच्या छेडछाडीच्या नियमात बदल करावा लागणार आहे. आतापर्यंत गोलंदाज गोलंदाजी करण्यापूर्वी बॉल घासून स्वच्छ करत, तसेच तो अधिक गुळगुळीत आणि चकचकीत करण्यासाठी त्याला थूंक लावत. मात्र, कोरोनाने जगभरात थैमान घातले असल्याने गोलंदाजांना बॉलला थूंक लावण्यास मनाई करण्यात येणार आहे. आयसीसीला याबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे.

टी-20, एकदिवसीय क्रिकेटसोबतच कसोटी क्रिकेटमध्ये बॉलची स्वच्छता, गुळगुळीतपणा आणि चमक खूप महत्त्वाची असते. त्यामुळे त्यांना स्विंग आणि रिव्हर्स स्विंग करण्यास मदत होते. बॉल स्वच्छ करताना तो घासण्यात येतो, तसेच काही गोलंदाज बॉलशी छेडछाड करतात. अशाच कारणामुळे स्टीव स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावर एक वर्षाची बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे कोरोनानंतर होणाऱ्या क्रिकेटच्या सामान्यांच्या निमय़ात बदल होण्याची शक्यता असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, याबाबत अधिकृत चर्चा झाली नसल्याचेही त्याने स्पष्ट केले. मात्र, कोरोनाच्या प्रकोपानंतर बॉलला थूंक लावणे इतर खेळांडूसाठी, पंच आणि संबधितांसाठी धोकायदायक ठरण्याची शक्यता असल्याने गोलंदाजांना बॉलला थूंक लावण्यास मनाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. मात्र, असे झाल्यास गोलंदाजाना स्विंग करणे कठीण होणार आहे. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक क्रिकेटपटूनीही गोलंदाजांनी बॉलला थूंक लावू नये, अशी मागणी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या