शाकीबला पुनरागमनाचे वेध

422

भ्रष्टाचारप्रकरणी आयसीसीकडून एका वर्षाची शिक्षा भोगत असलेला बांगलादेशचा अष्टपैलू क्रिकेटपटू शाकीब अल हसन याला आता राष्ट्रीय संघात पुनरागमन करण्याचे वेध लागले आहेत. शाकीब अल हसनची शिक्षा येत्या 29 ऑक्टोबरला पूर्ण होत आहे, पण त्याआधीच तो मैदानात उतरणार आहे. ढाका येथे तो क्रिकेटच्या सरावाला सुरुवात करणार आहे. कोच व ट्रेनरच्या मार्गदर्शनाखाली तो पुन्हा एकदा क्रिकेटचा श्रीगणेशा करण्याच्या तयारीत आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून अद्याप त्याच्या पुनरागमनाबाबत काहीही सांगण्यात आलेले नाही.

आपली प्रतिक्रिया द्या