टीम इंडिया फक्त ‘या’ संघासमोर हरणार, स्फोटक फलंदाजाची भविष्यवाणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

न्यूझीलंडच्या एका माजी क्रिकेटपटूने Cricket World Cup 2019 मधील प्रत्येक संघाबाबत भविष्यवाणी वर्तवली आहे. 10 संघांबाबत त्याने तपशीलवार नोंदी केल्या असून कोणता संघ किती सामने जिंकेल आणि कोणत्या संघासमोर पराभूत होईल याबाबत त्याने या नोंदीत लिहले आहे. टीम इंडिया आणि इंग्लंड हे दोनच संघ असे असतील जे 8 सामने जिंकतील फक्त एकच सामना गमावतील असे या फलंदाजाने म्हटले आहे. टीम इंडियाला हरवणारा संघ कोण असेल हे ही या फलंदाजाने नोंदीच लिहलं आहे.

ब्रँडन मॅक्युलम हा न्यूझीलंडचा माजी यष्टीरक्षक आणि फलंदाज आहे. त्याने त्याच्या डायरीमध्ये सगळ्या संघांबाबत त्याचे भाकीत डायरीमध्ये लिहून ठेवले आहे. फेसबुक पोस्टद्वारे त्याने त्याचे भाकीत जगजाहीर केले आहेत. ते काय आहे ते तुम्हीही पाहा

मॅक्युलमने वर्तवलेल्या भाकितामध्ये टीम इंडिया इंग्लंडच्या संघाकडून पराभूत होणार आहे तर इंग्लंडचा संघ हा ऑस्ट्रेलियाकडून पराभूत होणार आहे. हे दोन्ही संघ उर्वरीत सगळे सामने जिंकतील असे मॅक्युलमने म्हटले आहे.

Cricket world cup 2019 इस रंग बदलती दुनिया में!

मॅक्युलमच्या भविष्यवाणीवर भरवसा ठेवल्यास सगळ्यात मोठा धक्का हा श्रीलंकेच्या संघाला बसणार आहे कारण त्यांचा संघ फक्त वेस्टइंडीज विरोधात जिंकेल बाकी सगळे सामने हरेल. श्रीलंकेला बांग्लादेश, अफगाणिस्तानकडूनही पराभव स्वीकारावा लागेल असं मॅक्युलमने म्हटलंय. पाकिस्तानचा संघ टीम इंडियाकडून पराभूत होईल असंही मॅक्यलमने म्हटलं आहे. पाकिस्तानी संघ 5 सामन्यात पराभूत होईल तर 4 संघाकडून पराभूत होईल असं मॅक्युलमने म्हटलंय. मॅक्युलमने पाकिस्तानला वेस्ट इंडीजकडून पराभव स्वीकारावा लागेल असं म्हटलंय आणि त्याचं हे भाकीत खरं ठरलं आहे. इंग्लंड दक्षिण अफ्रिकेला पराभूत करेल असंही त्याने भाकीत वर्तवलं होतं, जे देखील खरं ठरलं आहे.