
खंडणीच्या गुन्ह्यात न्यायालयाने फरार घोषित केल्यानंतर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे गुरुवारी चौकशीसाठी मुंबई क्राइम ब्रँच युनिट-11 मध्ये हजर झाले. क्राइम ब्रँचने त्यांची जवळपास 7 तास कसून चौकशी केली. आपण इतक्या दिवसांपासून चंदिगढला होतो, असे परमबीर यांनी तपास अधिकाऱयांना सांगितले. गरज पडल्यास त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावले जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

































































