प्रेमप्रकरणामुळे संतापलेल्या वडिलांनी दिली मुलीच्या हत्येची सुपारी, अल्पवयीन मुलीला दिले विषारी इंजेक्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुलीच्या प्रेमसंबंधामुळे संतापलेल्या वडिलांनी तिला पोटॅशियम क्लोराईडचे विषारी इंजेक्शन देऊन मारण्याची सुपारी दिल्याची घटना उत्तर प्रदेशच्या मेरठ जिह्यात घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.

मेरठमध्ये बापाला मुलीचे प्रेमसंबंध असल्याचा संशय आला होता. 6 जुलैच्या संध्याकाळी त्यांना संशयावरून मुलीला शिवीगाळ करीत मारहाणही केली. नंतर, यापुढे घराबाहेर पडलीस तर मारून टाकीन, अशी धमकीही त्यांनी दिली. याच रागातून मुलीने छतावरून उडी मारली. तिला उपचारासाठी मोदीपुरम येथील फ्यूचर प्लस रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी प्रेमप्रकरणातून आपल्या मुलीने टेरेसवरून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे वडिलांनी चौकशीत सांगितले. मात्र चौकशीनंतर वडिलांनीच सुपारीकिलरच्या मदतीने मलीचा काटा काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

दरम्यान, मुलीच्या वडिलांनी आपल्याला एक लाख रुपयांची सुपारी दिली होती. रोख रक्कमही पूर्ण देण्यात आली होती, अशी माहिती सुपारीकिलर आणि त्याला मदत करणाऱया परिचारीकेने चौकशीअंती पोलिसांना दिली.