मुले पळविणारी तृतीयपंथीयांची टोळी सक्रिय

608
crime

मुरुडच्या एकदरा गावातील हायस्कूलमध्ये शिकणाऱया दोन विद्यार्थ्यांचा तृतीयपंथीयांकडून झालेला अपहरणाचा प्रयत्न  फसला. या प्रकारामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शाळेच्या मुख्याध्यापकांनी याप्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

एकदरा येथील सर एस. ए. हायस्कूलमध्ये पाचवीत शिकणारे दोन विद्यार्थी सकाळी 7 वाजता शाळेत जात होते. त्यावेळी शाळेच्या रस्त्यात पांढऱया रंगाच्या मारुती क्हॅनमधून येत साडी नेसलेल्या तृतीयपंथीयांनी या दोघांच्या तोंडावर हात दाबून त्यांना आत कोंबले. मात्र किद्यार्थ्याने तृतीयपंथीयांच्या हाताला चावा घेत वाचवा-वाचवा अशी बोंबाबोंब केली. अखेर अपहरणकर्त्यांनी तातडीने क्हॅनचा दरवाजा उघडून या दोन्ही मुलांना गाडीबाहेर ढकलून पळ काढला. त्यानंतर या मुलांनी रडत-रडत घर गाठून हा प्रकार सांगितला.

 

आपली प्रतिक्रिया द्या