
भांडुप येथील ड्रीम्स मॉल आगप्रकरणी मॉल व्यवस्थापन आणि सनराईज रुग्णालय व्यवस्थापक, मालकावर गुन्हे दाखल करून तत्कालीन प्रभारी प्रमुख अग्निशमन अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश मंगळवारी पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले. या दुर्घटनेत 11 जणांचा बळी गेल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
याप्रकरणी उपायुक्त प्रभात रहांदळे यांनी मंगळवारी चौकशी अहवाल सादर केला. 2018 मध्ये ड्रीम्स मॉलमध्ये अग्निसुरक्षेत आढळलेल्या त्रुटी दुर करण्यात अग्निशमन दल अपयशी ठरले. त्यामुळे तत्कालीन अधिकाऱ्यांचीही चौकशी होणार आहे. तसेच अग्निप्रतिबंधक यंत्रणा सुस्थितीत असल्याचा अहवाल देणाऱ्या पोना कॉर्पेरेशनचे परवाने रद्द करून गुन्हा दाखल करण्यात येणार.
या बाबींवर ठपका
- इमारतीतील बेकायदा बांधकाम, अंतर्गत अग्निसुरक्षा सुरू नसणे, परवानगी नसताना 45 सिलिंडरचा साठा करणे.
- भांडुप प्रभागाच्या इमारत व कारखाने विभागाने 2019 मध्ये मॉलमधील बेकायदा बांधकामावर कारवाई केली होती, मात्र तेव्हा खिडक्यांसमोर बेकायदेशीर बांधण्यात आलेल्या भितींवर कारवाई झाली नाही.





























































