रोनाल्डोची कोका कोलाला किक! मार्केट व्हॅल्यू घसरली; कंपनीला 29 हजार कोटींचे नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पोर्तुगालचा दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तीयानो रोनाल्डोमुळे कोका कोला या शीतपेय बनवणाऱया प्रख्यात कंपनीला तब्बल 29.34 हजार कोटींच्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. युरो फुटबॉल चॅम्पियनशिपमधील लढतीसाठीच्या पत्रकार परिषदेदरम्यान टेबलावर कोका कोला ब्रॅण्डच्या बॉटल्स ठेवल्या होत्या. ख्रिस्तीयानो रोनाल्डो याने या बॉटल्स तिथून हलवल्या. या कारणामुळे या कंपनीची शेअर व्हॅल्यू 56.10 डॉलर्सवरून 55.22 डॉलर्स इतकी खाली आली आहे. यामुळे या कंपनीची मार्पेट व्हॅल्यूही घसरली आहे.

कोका कोला ही कंपनी युरो फुटबॉल चॅम्पियनशिपची ऑफिशियल स्पॉन्सर आहे. या कंपनीची मार्पेट व्हॅल्यू 242 अरब डॉलर्स इतकी होती. पण ख्रिस्तीयानो रोनाल्डो कोला कोलाच्या बॉटल्स पाहून भडकला आणि त्या बॉटल्स तिथून हलवल्या. या कारणामुळे आता या कंपनीची मार्केट व्हॅल्यू 238 अरब डॉलर्स इतकी झाली आहे. दरम्यान, ख्रिस्तीयानो रोनाल्डो आपल्या फिटनेसकडे गांभीर्याने लक्ष देतो. कोल्ड ड्रिंक व एयरेटेड ड्रिंक यापासूनही तो दूर राहतो. त्यामुळे कदाचीत कोका कोलाच्या बॉटल्स पाहून तो भडकला असावा.