370 कलम काढल्याबद्दल टीका करणे गैर नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रत्येक टीकेला गुन्हा मानले तर लोकशाहीच टिकणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने खडसावले

370 कलम रद्द केल्याबद्दल टीका करणे, पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देणे हे काही गुन्हे नव्हेत. अशा प्रत्येक टीकेला गुन्हा मानलं तर लोकशाहीच टिकणार नाही, अशी टिप्पणी करत आज सर्वोच्च न्यायालयाने यासंबंधी महाराष्ट्र पोलिसांनी प्रा. जावेद अहमद हाजम यांच्यावर दाखल केलेला गुन्हा रद्द केला.