क्रिप्टो करन्सीच्या नावाखाली फसवणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime news new

क्रिप्टो करन्सीच्या नावाखाली खासगी कंपनीच्या अधिकाऱयाची फसवणूक प्रकरणी एकाला उत्तर प्रादेशिक सायबर पोलिसांनी अटक केली. अरबाज मन्सुरी असे त्याचे नाव आहे. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

तक्रारदार हे खासगी कंपनीत वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करतात. काही दिवसांपूर्वी त्यांना एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जोडण्यात आले होते. त्यात म्युचल फंड, स्टॉक मार्केट आणि क्रिप्टो करन्सी गुंतवणुकीबाबत प्रवृत्त केले जात होते. गुंतवणूक केल्यास चांगला फायदा होईल असे त्याना भासवण्यात आले. त्यावर विश्वास ठेऊन त्याने 60 लाख रुपयांची गुंतवणूक केली. केलेल्या गुंतवणुकीवर सव्वा दोन लाख डॉलर नफा झाल्याचे भासवण्यात आले. ती रक्कम त्यांना बँक खात्यात ट्रान्स्फर करता येत नव्हती.

वारंवार संपर्क साधून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. त्यांना आणखी पंधरा टक्के रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने उत्तर प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद केला. तपासा दरम्यान पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अरबाजला ताब्यात घेऊन अटक केली. त्याने बँक खाती पुरवल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

दहा लाखांची रोकड पळवणाऱयाला अटक 

व्यावसायिकाची दहा लाखांची रोकड पळवणाऱ्याला कांदिवली पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून सात लाखांची रोकड हस्तगत केली आहे. तक्रारदार हे कांदिवली येथे राहतात. त्याचा स्टॉक मार्पेटचा व्यवसाय आहे. 7 एप्रिलला त्याने त्याच्या मित्राकडून दहा लाखांची रोकड घेतली होती. त्याने ती रोकड मोटारसायकलच्या डिकीत ठेवली होती. मोटारसायकल पार्प करून ते दुकानात साहित्य आणण्यासाठी गेले होते. त्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने डिक्कीत ठेवलेली रोकड चोरून पळ काढला. हा प्रकार लक्षात येताच त्याने कांदिवली पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. या प्रकरणी वरिष्ठ निरीक्षक करण सोनकवडे, पोलीस निरीक्षक शेखर शिंदे आदींच्या पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे एकाला गुजरातमधून ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडून सात लाखांची रोकड जप्त केली आहे.