
ठाणे ते सीएसएमटी भुयारी उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प (एमयूटीपी) टप्पा-4 मध्ये त्याचा पुन्हा समावेश केला आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या ठाणे ते सीएसएमटी हे अंतर अवघ्या 21 मिनिटांत पार करण्याच्या स्वप्नाला पुन्हा धुमारे फुटले आहेत.
पनवेल ते वसई व्हाया दिवा उपनगरीय रेल्वे मार्गाचा प्रस्ताव दोन वर्षांपासून राज्य सरकारकडे आहे. या मार्गावर 11 नवीन स्थानकांचा समावेश असणार आहे. वसई ते पनवेल प्रवासाची 15 ते 20 मिनिटांची बचत होणार आहे. प्रस्तावित मेट्रो मार्गांमुळे पनवेल ते सीएसएमटी एलिवेटेड फास्ट कॉरिडॉर आणि ठाणे ते सीएसएमटी भुयारी मार्ग बाजूला पडले आहेत. राज्य सरकारने पुढाकार घेतला तर ते पुढे सरकतील, असे एमआरव्हीसीचे अध्यक्ष रवी अगरवाल यांनी सांगितले.
एमयूटीपी टप्पा क्र.3 अ (मंजूर )
गोरेगाव ते बोरिवली हार्बर विस्तार बोरिवली ते विरार पाचवी आणि सहावी मार्गिका चौथी मार्गिका कल्याण ते आसनगाव तिसरी व चौथी मार्गिका कल्याण ते बदलापूर कल्याण यार्ड रिमॉडेलिंग
टप्पा क्र.4 ‘ऑन द टेबल’
4 (अ) पनवेल ते वसई उपनगरीय कॉरिडॉर 4 (ब) ठाणे ते सीएसएमटी भुयारी कॉरिडॉर 4 (क) पनवेल ते सीएसएमटी एलिवेटेड फास्ट कॉरिडॉर.
33.8 कि.मी.च्या या भुयारी मार्गावर नऊ डब्यांच्या मेट्रोसारख्या ट्रेन (2,700 प्रवासी एका ट्रेनची क्षमता ) दरताशी 90 कि.मी.च्या वेगाने चालविण्याची योजना आहे. सध्या या मार्गावर फास्ट लोकल भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर आणि मुलुंड स्थानकावर थांबतात. या नव्या मार्गावर सीएसएमटी, दादर, कुर्ला, घाटकोपर, भांडुप आणि ठाणे येथे गाडय़ा थांबतील. या प्रकल्पाची किंमत 15 ते 18 हजार कोटी रुपये इतकी असून त्यासाठी फक्त25 हेक्टर खासगी जागा लागणार आहे.
























































